२४ ऑक्टोबर, २०१२

खूप काही सांगते माझी आई


खूप काही सांगते माझी आई
काय आणि किती गाऊ तिची गुणगाई
ती बोलते, बोलतोस तू किती कमी,
आणि राजा लिहतोस जास्त!
मनातलं बोलत जा जरा,
उगाच नको बसू स्वस्थ!
ती म्हणते, एवढा हुशार आणि शहाणा तू
उगाच कशाला डोळ्यात तुझ्या पाणी ?
लोकांचं मनाला नाही लावायचं वेड्या,
मला माहित आहे ना तुझी कहाणी..
ती विचारते, स्वतः समजू शकतोस ना तू?
मग कुणाची गरज काय तुला?
तीरासारखे शब्द आहेत ना तुझे,
मग गाफील राहतोस कशाला?
ती सांगते, तुला आहे माझा आशीर्वाद,
आणि वडिलांचा पाठीवर हात!
गाढून टाक एकदाचे अटकेपार झेंडे,
नंतर बघ कडकडतील लोकांचे दात!
- परेश पाटील

१५ ऑगस्ट, २०१२

***प्रेमात असं काही***














मला माहित नव्हतं प्रेमात असं काही होतं
जिवापलीकडे मन तिच्याच प्रेमात बेधुंद होतं...!

समोरून कोणी हाक दिली तर बकवास वाटतं,
तिचा एकाच शब्द पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं...!

तिचा एक एक मेसेज पुन्हा पुन्हा वाचवा वाटतं,
तिचा कडू शब्द सुद्धा मन हसवतं...!

खरच काय प्रेम एवढं वेडं असतं?
ती 'हो' म्हणेपर्यंत रडवत राहतं...!

एकदा तरी तिला डोळ्यात डोळे घालून पहावं वाटतं,
तिच्याविना जग सारच केविलवाणा दिसतं...!

आतुरता असते तिने काहीतरी बोलाव वाटतं,
तिच्यासंग सारं काही "share" करायचं असतं...!

- परेश पाटील

२७ जुलै, २०१२

प्रेम क्षितिजापलीकडले


पहिल्यांदाच असं कुणी एकांतात भेटलं
जे खरच मनात घर करून राहिलं
खरं सांगावं तर अचानक भेट झाली
पहिलाच असं कुणी जीवनाच्या प्रवासात भेटलं

न आवाज ऐकला कधी, न पाहिलं मी तिला
क्षितिजाच्या दूर राहूनही तीन घेरलं मला
शब्दात ती प्रेमाची व्याख्या काय करावी
अदृश्य राहूनही तिनं प्रेमात अडकवलं  मला


हा खेळ निसर्गाचा कि धाव मनाची
पण हि वेळ सुंदर स्वप्नांच्या अल्लड प्रवासाची
कुणास ठाऊक काय असाव तिच्या मनात
तरीही डोळे उघडताच ती प्रीत माझ्या हृदयाची

फक्त स्वप्नातच जगायचं कि दृश्य विश्वात
काहीच न घडता "वेड्या तू गुंतलास कसा तिच्यात?",
विचार तिला तू होशील का माझी रागिणी?
नाहीतर तुझे दिवस सरतील उगाच तिच्या आभासात

आत्ता तिलाच ठरवुदे  कि आपण कोण बिचारे
मी नदी तू सागर, कि एकाच सागराचे दोन किनारे...
ह्या आयुष्यत भेट होईल का आपली कधी?
उघडशील काय माझ्यासाठी तुझ्या हृदयाची द्वारे?

- परेश पाटील 

१३ फेब्रुवारी, २०१२

***शेतावर डोला (आगरी कविता)***

जमीन शिर्कोला (CIDCO) देवाची नाय,
पुन पार्टी वालला इकाची हाय...

एजंड रोज घरा यतय
अबला एजंडचा भाव पट नायं
म्हणून दोरी ताणून धाराची हायं...

एजंड शिर्कोची दावतय भीती
शिर्कोचे काय बापासाची नाय
पुन पोराला गारी झेवाची हाय...

आबचा इचार जमीन इकाचा हाय
मादीनूच बोलतय खावाचा काय?
पुन यंदा पोरीचा लगन कारचा हाय...

आबा बोलतय पोऱ्या कामाला लागलं
तरी शेवटी आयुष्याची जमीन जाय
पुन यंदा आपलेला घर भांदाचा हाय...

एजंडचा फावून तो आयला चरवतय
म्हणून आय बोलतय आबला
आव! करताव काय? मना लफ्फा कराचा हाय...

आरवान्स झेऊन उरणला जेलंवर
दुकानदार इचार करताय
खोपट्याचा बकरा दिसतंय
त्याला रगात वाकवून कापाचा हाय...

सयांची पाली जव यतय
तव आबची बयणीस उकटतय
ती बोलतय वाटा नको
मना आख्खी जमिनूच इकाची हाय...

- परेश पाटील

४ फेब्रुवारी, २०१२

तू

तू केलेले हृदयाचे तुकडे
कसे जोडू?
तू दिलेली निराशा मी
कशी फोडू?

... तू माझ्या रात्रीत नसलीस तर
कसे जागू?
तू घेतलेले माझे मन मी
कसे मागू?


तू दिलेल्या आठवणी मी
कश्या जाळू?
तू दिलेले आश्रू मी
कसे टाळू?

तू साथ नाही दिली तर
कसा जाऊ?
तू केलेले हृदयाचे तुकडे
कुणाला देऊ?

तू समोर नसलीस तर
काय पाहू?
तू शब्द थांबवलस तर
काय लिहू?

तू नसलीस तर मला
कसे वाटेल?
तुझ्यावर प्रेम केले मी
ते कसे विझेल?

तू जीवनात नसलीस तर
कसा वागेन?
तू निशब्द केलास तर
कसा जगेन?

- परेश पाटील